दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
जालना .. सोयाबीन, कापूस यासह इतर शेतीमालाचा वायदे बाजारात समावेश करावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सेबीने कृषीमाल वायदे बाजारावर बंदी घातली आहे. गहू, तांदूळ, मोहरी, मुग,
हरभरा, कापूस, सोयाबीन या पिकांच्या वायदे बाजारावर असणान्या बंदीला मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन या पिकांच्या वायदे बाजारावर असणान्या बंदीला मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे कृषी मालाचा वायदे बाजारात समावेश नसल्याने बाजारपेठेत या मालाचे भाव वाढत नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बंदी उठवून सोयाबीन व कापूस यासह इतर शेतीमालाचा वायदे बाजारात समावेश करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना ९ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले 23जानेवारी पर्यंत या संदर्भात समाधानकारक निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल व मुंबई येथील सेबीच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.
या आंदोलनात डॉ. अप्पासाहेब कदम स्वतंत्र भारत पर्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष. सौ. गिताताई, खांडेभराड गाजी पंत अध्यक्ष शेतकरी संघटना, बाबुराव गोर्ड राज्य कार्याकारी सदस्य शेतकरी संघटना.उत्तमराव काळे जिल्हाप्रमुख शेतकरी संघटना जालना,पूजाराम सुरूंग स्व.भा. पार्टी जिल्हाअध्यक्ष,नितीन देशमुख तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना जालना, गजानन भांडवले जेष्ठ कार्यकर्ते., विश्वभर भानुसे शे.सं. घनसावंगी तालुका अध्यक्ष,संतोष खराबे शे.सं.मंठा तालुका अध्यक्ष,ज्ञानदेव काकडे युवा अघाडी प्रमुख मंठा तालुका, हनुमान अडसूळ तालुका अध्यक्ष स्व.भा. पार्टी मंठा तालुका, संताराम राजबिंडे युवा आघाडी प्रमुख जालना जिल्हा,शिवाजी काकडे,खांडेभराड पीएस स्वी,अप्पा चोखनफळे,भरतराव खांडेभराड,महादेव बोरूडे,नागोराव कापसे शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष, नाथा सस्ते,भगवान काकडे, हूरी विनु माहोरकर,पिराजी मेहेत्रे, श्रीरंग मोहीते, गणेशराव मोहीते,
सदाशिव खलसे माजी तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना जालना, संतोष चव्हाण बदनापुर शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष,प्रमेश्वर बनकर शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष जाफ्राबाद,काकासाहेब साबळे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष भोकरदन. पडीतराव संपतराव सपने, लक्ष्मण बी. कावळे,भगवान काशीनाथ कापसे, भगवान पाटीलना कायदे,भगवान गायकवाड,
दगडु शेळके,गुलाब रामबुवागिरी आदिसह अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.


