दैनिक चालू वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी-शितल रमेश पंडोरे
==========================
संभाजीनगर:- दि.10 जानेवारी 2023 रोजी आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब हे औरंगाबाद दौर्यावर आले आसतांना अंबेलोहोळ ते तुर्काबाद खर्राडी ता.गंगापुर या रोडवर जय संघर्ष वाहन चालक सामाजीक संस्था प्रणित जय संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर ,उपाध्यक्ष श्री सोमनाथ गायकवाड व कोअर कमिटी सदस्य श्री रविंद्र सुरडकर यांनी श्री दिलीप मोटे साहेब यांना फोन करूण पडळकर साहेबांना थांबवण्याची विनंती केली आसता.आमदार महोदयांनी पण संजय हाळनोर यांच्या विनंतीला मान देऊन चालकाला वाहन थांबवण्याची सुचना केली व श्री संजय हाळनोर यांच्याशी किमान दहा मिनिटे वाहन चालकांच्या मागण्या संदर्भात आत्मीयतेने चर्चा केली व तुमच्या ज्या काहि रास्त मागण्या आसतील त्या सर्व मागण्यांचा माझ्या कडून पाठपुरावा केला जाईल असे ठोस आश्वासन देऊन सदरील मागण्यांचे निवेदन श्री गोपिंचंद पडळकर साहेबांनी स्विकारलेले.
तसेच श्री पडळकर साहेबांनी स्वत:च्या इस्टाग्राम आय डी वरूण सोशल मीडियावर सेअर देखील केले.


