दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक या पदावर समीर शेख यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्याकडून दिवाळीत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदभार त्यांनी स्वीकारला होता. बुधवारी सायंकाळी उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कारभाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये जयश्री पाटील तळबीड पोलीस ठाणे ते जिल्हा वाहतूक शाखा सातारा, राजेश माने सातारा शहर पोलीस ठाणे ते पाचगणी पोलीस ठाणे, संतोष तासगा़ंवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा ते मेढा पोलीस ठाणे, अमोल माने मेढा पोलीस ठाणे ते सायबर पोलीस ठाणे, संदीप शितोळे पुसेगांव पोलीस ठाणे ते जिल्हा विशेष शाखा सातारा, आशिष कांबळे भुईंज पोलीस ठाणे ते वाचक उपविभागीय विभाग वाई, सतीश पवार पाचगणी पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा, संतोष पवार ढेबेवाडी पोलीस ठाणे ते स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अभिजीत चौधरी सातारा तालुका पोलीस ठाणे ते ढेबेवाडी पोलीस ठाणे, अभिजीत यादव शाहूपुरी पोलीस ठाणे ते वाहतूक नियंत्रण शाखा सातारा, विठ्ठल शेलार वाहतूक नियंत्रण शाखा सातारा ते मसूर पोलीस ठाणे, धोंडीराम वाळवेकर नियंत्रण कक्ष ते मानवी संशोधन पोलीस कल्याण सातारा, संदीप मोरे सातारा शहर पोलीस ठाणे ते कराड शहर पोलीस ठाणे, शिवाजीराव विभूते नियंत्रण कक्ष सातारा ते कराड शहर पोलीस ठाणे, अनिता मेनकर स्थानिक गुन्हे शाखा ते सातारा तालुका पोलीस ठाणे, आरती नांद्रेकर नियंत्रण कक्ष सातारा ते भरोसा जेल सातारा, राहुल वरोटे कराड शहर पोलीस ठाणे ते तळबीड पोलीस ठाणे याप्रमाणे सातारा जिल्हा पोलिस दलातील कारभारांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यांत आले आहेत.यामध्ये पोलीस उपनिरीक्षक या दर्जेतील अधिकाऱ्यांच्या सुद्धा जिल्हा अंतर्गत बदल्या माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांनी केल्या. पदस्थापने ठिकाणी तत्काळ पदभार घेण्याचे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.


