दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :-तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पाथरूड येथे राजमाता जिजाऊ व थोर विचारववादी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांनी संबंध देश नव्हे तर जगाला आपल्या उज्वल कारकिर्दीने आपलेसे करून घेतले.यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे योगदान निश्चितपणे प्रत्येक माऊलीला आदर्शवत आहे.
स्वामी विवेकानंद यांनी मोठ्या विचाराच्या दूरदृष्टीने बाहेर देशात सुद्धा आपले प्रतिभावंत विचार देऊन सक्षम तरुण पिढी घडवण्यासाठी चांगले प्रयत्न केले.हे विचार आजच्या पिढीने आत्मसात करून पुढे जाण्याची निश्चितपणे गरज आज वाटते असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
तसेच जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने व मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर पाथरूड गावातील जवळपास ८०० कुटुंबीयांना घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत प्रत्येकी दोन कचराकुंडीचे वाटप होणार आहे जेणेकरून गावच्या स्वच्छतेसाठी सामूहिक प्रयत्न होईल व पाथरूड कायम स्वच्छ व सुंदर राहील याची काळजी घेतली जाईल ही घोषणा गावच्या सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी गावच्या सरपंच विजया टिकटे,उपसरपंच तानाजी बोराडे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे,शिवाजीराव टिकटे,सेवक टिकटे,आशिविनी शहाजी आठवले,सिद्धी सहदेव बोराडे,धोंडिबा टिळक,प्रदीप खुणे,बाप्पा पवार,शिवाजी फाळके,सोनाली खुणे,शुभांगी पौल,पल्लवी गजरे,शोभा टिकटे,गीता ढवारे,वैशाली वारे,ग्रामविस्तार अधिकारी भागवत राठोड,लिपील अशोक बोराडे,नागेश पवार,विलास जाधव व तसेच गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


