दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -इस्माईल माहेबूब शेख
जी.प.प्रा शाळा शिऊर ता. निलंगा येथे ”राजमाता जिजाऊ” व ”स्वामी विवेकानंद’ जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊच्या वेशभूषेतील विध्यार्थिनी कु.मयुरी तुगावे होती, तर शाळेतील सर्व महिला शिक्षिका प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सर्वप्रथम ”राजमाता जिजाऊ” व ”स्वामी विवेकानंद” यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील २० विध्यार्थी यांनी आपले मनोगत इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषेतून व्यक्त केले. इयत्ता ४ ठी ची प्रगती साळुंके हिने गीतातून तर वैष्णवी रंडाळे हिनी इंग्रजीतून मनोगत वेक्त केले. बिरादार शिवानी हिने शायरीच्या माध्यमातून तर आदिती सूर्यवंशी हिने गीतातून जिजाऊ च्या कार्याचा गौरव सांगितला .पाकिजा , आयान यांनी चारोळीच्या माध्यमातून जिजाऊ चा गौरव केला. याप्रसंगी श्रीमती डोंगरे व्ही. एम , श्रीमती इंचुरे एन, व्ही, श्रीमती कोलेवाड एस व्ही श्री बिरादार शिवकुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मु.अ.श्री भूक्केवाड दि एन इंदुताई बिरादार , सागर शत्रुघ्न बबिता डीगोळे यांनी परिश्रम घेतले.


