
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
बोधन – तेलंगणा राज्यातील बोधन येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शिवा संघटनेचा प्रचंड मोर्चा शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली धडकला वीरशैव लिंगायत समाजातील युवक श्रीकांत यांच्या मारेकऱ्यांना पोलीसांनी तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
भारतातील तमाम वीरशैव लिंगायत समाजाचे एकमेव धाडसी व धडाडीचे नेतृत्व असलेले शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर असुन वीरशैव लिंगायत समाजासह बहुजनांवर कुठे अन्याय झाला तर ते तिथे तात्काळ धावून जाऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात.
तेलंगणा राज्यातील बोधन येथे वीरशैव लिंगायत समाजातील २० वर्षीय युवक श्रीकांत यांना एका मुलीला का बोललास म्हणून या क्षुल्लक कारणावरून त्यांचा खून करण्यात आला आहे.
तेव्हा मयत युवक श्रीकांत यांच्या कुटूंबीना न्याय मिळावा श्रीकांत च्या मारेकऱ्यांना पोलीसांनी तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदरील प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली बोधन येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवा संघटनेचे तेलंगणा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश कर्नाटकसह आदी राज्यातील शिवा संघटनेचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
तसेच निवेदनाच्या प्रति देशाचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा, तेलंगणाचे मुख्यमंत्री टी. चंद्रशेखर राव , गृहमंत्री, जिल्ह्यधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.