दैनिक चालु वार्ता निलंगा ता.प्रतिनिधी-इस्माईल महेबूब शेख
==========================
निलंगा:- दि:- १६/०१/२०२३ मैजे शिऊर ता निलंगा येथे स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्य चला जानुया नदीला या कार्यक्रमा अंतर्गत मांजरा नदी संवाद अभियान साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतून शाळेतील मुलांची रॅली कडून, लेझीम, ढोल आणि जनजागृती घोषणा देत नदीच्या मार्गाने काढण्यात आली. हा कार्यक्रम चला जानुया नदीला या शासन मान्य खाजगी संस्थेच्या माध्यमातून काढण्यात आला. आणि संस्थेच्या पदाधिकारी यांनी रॅलीत सहभाग घेऊन नदीकाठावर येऊन नदीचे पाहणी केली, त्याचबरोबर नदी काठाचे सर्व प्रकारचे सर्वेक्षन केले, यात नदीच्या पाण्याबरोबरच, नदीकाठावर येणारे अडथळे, दूषित पाणी होण्याची कारणे, आणि नदीची भौगोलिक, आणि क्षेत्रीय पाहणी करून गावकऱ्यांकडून पाणी दूषित का होते याच्या सर्व अडचणीची आणि करणे जाणून घेतले. आणि यास वर कोणकोणत्या उपाय योजना करता येतील या संदर्भात सर्व माहिती लिहून घेतली. आणि शेवटी जिल्हा परिषद शाळेत सर्व विध्यार्थी आणि गावकरी यांना, प्रा डॉ हनूमंत साळुंके यांनी मांजरा नदीच्या उगमापासून नदीच्या काठावर येणाऱ्या सर्व गावासाहित, नदीचे पाणी दूषित होण्यापासून कसे थांबवता येईल यावर मार्गदर्शन केले, आणि त्या संदर्भात विडिओ दाखवण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बिरादार सर यांनी केले, कार्यक्रमाचे अधेक्ष जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री बुक्केवाड सर यांनी स्वीकारले तर, या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री सूर्यवंशी भानुदास, उपसरपंच श्री शेषेराव बंडगर, आणि ग्रामपंचायत चे सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आवर्जून उपस्थिती दिली, तर हा कार्यक्रम गावचे ग्रामसेवक श्री शिवाजी मोरे आणि तलाठी पोचापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


