दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी :-संतोष मनधरणे
देगलूर :देगलूर तालूक्यातील सांगवी( क) येथील कै.मोघे बंडु घाळप्पा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सदगुरु ष.ब्र.108 श्री.श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा यांचे ता.वीस रोजी शुक्रवारी संध्याकाळी ठिक चार वाजता सांगवीत आगमन होणार असून यावेळी महाराजाचें भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. सांयकाळी सहा ते आठ या वेळत गुरुमाऊजींचे प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केले असून, या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक सुधाकर नागनाथ मोघे व शंकर वैजनाथ मोघे यांनी केले आहेत.दरम्याण महाराजाच्या दर्शन सोहळ्या नंतर राञी भजनाचा कार्यक्रम आयोजिक केले असून यावेळी सुप्रसिधद भजन गायक कु.शितलताई सुरनर उदगीरकर,तुकाराम पांचाळ चांडोळकर,श्रीकांत पंढरपूरे काठेवाडीकर,शाहीर माणिक कोकले कुरुडगीकर,शिवाजीराव मोकले कुंडलवाडीकर,मुरलिधरराव भुताळ देगलूरकर यांच्यासह नामवंत गायक व वादकाची उपस्थिती राहणार आहे.


