दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विध्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. साक्षी गायकवाड असे या आत्महत्या केलेल्या विध्यार्थीनी चे नाव आहे .शिक्षणाचा पॅटर्न म्हणून लातूरकडे पाहिले जात असल्याने राज्यभरातून विध्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये येतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात विध्यार्थी लातुरात वास्तव्यास आहेत .औरंगाबाद येथील साक्षी गायकवाड ही विध्यार्थीनी सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लातूर येथील स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती .एमबीबीएस च्या प्रथम वर्षांची परीक्षा आहे.त्यामुळे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास साक्षीच्या अन्य दोन रूममेंट अभ्यासासाठी ग्रंथालयात गेल्या होत्या .दरम्यान, सकाळी साक्षी गायकवाड या विध्यार्थीनीने वसतिगृहातील खोलीमध्ये छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना थोड्या वेळाने १० च्या सुमारास स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली.त्यांनी याची माहिती स्वच्छता इन्स्पेक्टर तेलगावकर यांना दिली. विध्यार्थीनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तेलगावकर यांनी ही घटना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. समीर जोशी यांना दिली.माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली . गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे . साक्षी ने आत्महत्या का केली याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.साक्षी ही हुशार विध्यार्थीनी होती त्यामुळे तिच्या आत्महत्येमुळे तिच्या मैत्रिणीही धक्का बसला आहे . घटना घडली तेव्हा साक्षीचे आई – वडील औरंगाबाद ला होते .या घटनेची माहिती मिळताच ते लातूरकडे निघाले .
{ घटनेबाबत स्पष्टता }
लातूर मध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या एका विध्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडलीही विध्यार्थीनी लातूर येथील स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती या विध्यार्थीनीने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अध्यापही स्पष्टता नाही.या घटनेमुळे इतर विध्यार्थीनिंना धक्का बसला आहे


