दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- शहरातील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी यश सुरेश चाकरे यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत दहा मिटर पिस्तूल या नेमबाजीत स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गुरुवर्य बाबुजी सुकाळे,विनायक म्हस्के,वसंत वाघमारे, दत्तात्रय पालके,शहर अध्यक्ष रोहित गायकवाड,वैभव गायकवाड, प्रदीप चंदनशिवे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.


