दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील माजी सैनिकांचा सहकुटुंब सहपरिवार स्नेह मेळावा आर्मी डेच्या निमित्ताने घेण्यात आला. असे कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतले जावेत, अशा कार्यक्रमासाठी प्रत्येकाने सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सैनिक फेडरेशनचे तालुका सचिव प्रभाकर हाके यांनी केले.
सोमवार दि १६ रोजी माजी सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख,सचिव प्रभाकर हाके यांच्या पुढाकाराने प्रथमच भूम येथे आर्मी डे दिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिदास शिंदे, माजी सैनिक फेडरेशनचे जिलहाध्यक्ष बाळासाहेब जावळे,लक्ष्मण पौळ,परंडा तालुका अध्यक्ष तुकाराम चव्हाण,वाशी तालुका अध्यक्ष बबनराव कोळी,श्रीकांत चव्हाण,वीर पत्नी श्रीमती नागरगोजे जयवंतनगर यांच्यासह भूम, परंडा, वाशी, तुळजापुर, धाराशिव तालुक्यातील असंख्य माजी सैनिक उपस्थित होते.
या भारतीय स्थलसेना दिवस ( आर्मी डे )च्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अनेक माजी सैनिकांचा एकमेकांशी संवाद होऊन परिचय झाला, अनेकांनी एकमेकांच्या अडीअडचणी, समस्या एकत्रितपणे मांडल्या आणि त्या समस्या एकत्रितपणेच प्रशासकीय कार्यालयाकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्या संदर्भात एकीचे बळ दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी सैनिकांच्या पत्नीची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि पूर्णपणे आर्थिक खर्चाची तरतूद देखिल माजी सैनिक फेडरेशनचे तालुका सचिव प्रभाकर हाके यांनी केले होते.
प्रस्तावित विधिज्ञ भानुदास नागरगोजे यांनी केले या कार्यक्रमासाठी माजी सैनिक फेडरेशनचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके यांच्यासह दिलीप भोसले, प्रभाकर वरबडे , कारभारी गाढवे, अनिल दादाराव बराटे, कांतीलिंग मोराळे, शहाजी पगारे, हनुमंत मस्कर, प्रभाकर औताडे,पांडुरंग खोसे, पोपट जाधव,दत्तात्रय गिलबिले. दादाहरी तेलंगे . दत्ता पवार , नारायण जाधव, भगवान धुमाळ आदींनी परिश्रम ही घेतले.


