दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी.
देगलूर तालुक्यातील एका तरुणाने दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून
गावाला जात असलेल्या वेअर हाऊस जवळ नेऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवार रात्री घडली. या तरुणास अटक केले आहे. खानापूर सर्कल येथील जनप्रवास दोन अल्पवयीन मुली 17 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास स्वच्छालय साठी गावातील रस्त्याने जात असताना या रस्त्यावरून नियमित ट्रकवर चालणारा बालाजी अनिल हिमगिरे (वय 25 रा. भक्तापूर रोड देगलूर ) हा ओळखीचा तरुण मोटरसायकलवरून जात असताना या दोन अल्पवयीन मुलींना पाहतात थांबला. व गाडीवर बसण्यास सांगितले मुलींना नकार देतात या दोघांनी जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून सुंडगी फाट्याच्या पुढील वेअर हाऊस कडे घेऊन गेला. तेथे मोटरसायकल थांबून या दोन अल्पवयीन मुलींना जीवी मारण्याची धमकी देत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पिढीत्यांच्या जबाबानुसार येथे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देखील पोलीस करीत आहेत.


