दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
—————————————-
पुणे : पुण्यामध्ये G20 परीषदचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सु शोभीकरण करण्यात आले. पुणे महानगरपालिकेणे ह्या परीषेदेसाठी खूप कमी कालावधीमध्ये चांगले काम करून दाखविले. जरी चांगले काम केले असले तरी, खरंच पुण्याच्या इतर भागांमध्ये चांगली स्थिती आहे. का प्रशांत कांबळे आम आदमी पार्टीचे सभासद आंबेगाव हनुमान नगर त्यांनी, त्यांच्या येथे काय समस्या आहेत. अनेक वर्षापासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. अशा घाणेरड्या पाण्यामधून शाळेकरी मुलं, महिला अनेक वेळा पडलेले आहेत. पाण्यामध्ये, ड्रेनेज लाईन ब्लॉक आहे, नाला उघडा व भरलेला असतो. त्यामुळे डेंगू, मलेरिया अशा विविध समस्येला नागरिकांना सामना करावा लागतो. दत्तनगर चौक सकाळ संध्याकाळ ट्राफिक जाम ची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. पर्यायी रस्ता नाही आम्ही या सर्व समस्या घेऊन क्षेत्रीय कार्यालयात गेलो की अधिकारी सांगतात महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, इलेक्शन झाल्यावर बघू जर महानगरपालिकेकडे पैसे नाहीत तर G20 सारखी परिषद पुण्यामध्ये कशासाठी आणि एवढा अफाट खर्च कुठून केला हा नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न भेडसवत आहे. पुढे असा खर्च नागरिकांसाठी पुणे महानगरपालिका करेल अशी आशा आहे.


