दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई आणि महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री समाज प्रबोधन व संशोधन संस्था जव्हार यांच्यामार्फत महिला समुपदेशन सल्लागार केंद्राची स्थापना पंचायत समिती जव्हार येथे तहसीलदार आशा तामखडे यांच्या हस्ते करण्यात आले.आदिवासी भागातील लाभार्थ्यांना महिला समुपदेशनाचा लाभ या केंद्रामार्फत देऊन महिला सक्षमीकरणास संस्थेमार्फत निश्चित मदत होणार आहे.स्वयंसेवी संस्थेने गंभीरतापूर्वक घेतलेली ही जबाबदारी सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची आहे.
केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती जव्हारचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर,योगेश चंदे सहाय्यक गट विकास अधिकारी,यशवंत पराते विस्तार अधिकारी यांचेही बहुमोल मार्गदर्शन केंद्रास मिळाले.संस्थेच्या अध्यक्षा भावना घोलप यांनी राज्य आयोगाकडून महिला समुपदेशन केंद्राची जबाबदारी स्वीकारताना आपल्याकडे विधीतज्ञ व समाज विकासतज्ञ असून अन्य सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत.आम्हाला महिला आयोगचा प्रकल्प राबवण्याचा अनुभव आहे.यापूर्वी आम्ही अश्या प्रकारचे जनजागृतीचे प्रकल्प राबविले आहेत.ज्या केसेस आमच्याकडे येत होत्या त्या केसेस आम्ही योग्य त्या समुपदेशनाद्वारे सोडवल्या आहेत असे त्यांनी या वेळी सांगितले.


