दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजीत सप्ताह कार्यक्रमांत सामाजिक सांस्कृतिक क्रिडा आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल होती.संस्था चेअरमन समीर बनकर आणि प्राचार्य प्रकाश हाके यांच्या नियोजनाने आयोजीत करण्यात आलेल्या सप्ताह कार्यक्रमांत सात दिवस सात पुष्प गुंफताना ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या साठी शिक्षणाचा प्रसार करणारे प.पु.बापूजी साळुंखे अनन्य साधारण व्यक्तिमत्व असणारे महापुरुष होते असे प्रतिपादन,सार्वजनिक वाचनालय म्हसळा तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांनी केले.स्वामी विवेकानंद सप्ताहानिमित्त कार्यक्रमाची पाचवी माळ गुंफण्याचा मान तालुका पत्रकार संघाला देण्यात आला होता या निमित्ताने आयोजीत ग्रंथ प्रदर्शन,चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी प्रदर्शन दालनाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर,प्राचार्य प्रकाश हाके,पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के,अशोक काते,उदय कळस,महेश पवार,श्रीकांत बिरवाडकर,निकेश कोकचा, अरुण जंगम,पर्यवेक्षक गायकवाड,श्रीमती देवबावकर,पाटील सर आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अशोक काते यांनी १९६३ पासूनचा म्हसळा तालुक्याचा शिक्षणविषयक इतिहास,त्यावेळच्या समस्या याबाबत सविस्तर माहिती देताना खडतर काळात प.पु. बापूजी साळुंखे यांनी केवळ कोकणातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्याला शिक्षण घेता आले पाहिजे हा एकमेव उद्देश समोर ठेऊन ज्ञानगंगेची दालने खुली केली असे सांगून त्याच काळात खऱ्या अर्थाने शिक्षणाची क्रांती सुरु झाली.महेश पवार यांनी मनोगतात ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या संस्थेच्या ब्रीदवाक्याच्या आधारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक विद्यार्थ्याने संस्कार जपण्याचे आवाहन केले.प्राचार्य प्रकाश हाके यांनी प्रास्ताविक करून स्वामी विवेकानंद साप्ताहाचा आढावा सांगितला.पाटिल सर यांनी सूत्रसंचालन केले.


