दैनिक चालु वार्ता म्हसळा – प्रतिनिधी – अंगद कांबळे
महिला बचत गटाची चळवळ आर्थिक गतिमान करण्यासोबतच स्वयं साह्यता समूहाद्वारे महिलांचे संघटन करून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर ग्रामीण भागातील महिला बनणार उद्योजक होण्यास मदतीचे ठरेल असे मत महीला अध्यक्षा मंदिनी धाडवे यांनी केलटे येथे महीला ग्राम संघाची स्थापना कार्यक्रमात व्यक्त केले.
उद्योग व्यवसायाला चालना दिली तर आर्थिक स्वावलंबन व आर्थिक नियोजनाचे धडे मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण जीवन्नोती (उमेद) अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर गावा गावात महिला ग्राम संघाची बांधणी सुरु आहे त्याच धरतीवर म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत केलटे अंतर्गत पाच दिवस महिलांकरिता उमेद अभियान राबविण्यात आले. अभियानामध्ये महिलांना मार्गदर्शन करण्याकरीता रत्नागिरी जिल्ह्यातून वरिष्ठ वर्धिनीनी उपस्थित राहुन विशेष प्रशिक्षण दिले.महिला बचत गटां विषयी योग्य मार्गदर्शन करून त्या बचत गटांचा ग्रामसंघ स्थापन केले.शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती देत त्याचा फायदा कसा घेता येईल या बाबत माहिती दिली.कार्यक्रमाला सरपंच गणेश बोर्ले, ग्रामसेवक विरकुड,सदस्य उमेश पवार,सदस्या प्रविणा कोबनाक,मंडळ उपाध्यक्ष किसन पवार,महीला अध्यक्षा मंदिनी धाडवे,सचिव श्रुतिका गिजे,आरोग्य सेविका कशिष सावंत,अंगणवाडी सेविका शारदा पवार,पंचायत समिती प्रतिनीधी साळवी,गोरटे सर वरिष्ठ वर्धिनी सुर्वे,करंडे,सावंत आदी मान्यव मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष आभार सरपंच गणेश बोर्ले यांनी मानले.
आयोजीत मेळावा हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी आसुन केलटे ग्रामपंचायत सक्षमतेने काम करेल.संपन्न मेळावा येणाऱ्या काळाची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी आसुन यातुन उद्योग
हाच पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. या कामी जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील-सरपंच
गणेश बोर्ले


