दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील कालव्या शेजारी केलेली लघुशंका एका वयोवृध्द इसमाला जीवघेणी ठरली आहे. घटनास्थळी उपस्थित तरुणाने विरोध करता त्या दोघांमध्ये प्रथम बाचाबाची व नंतर शिवीगाळी झाली. त्याचाच राग येऊन आरोपी तरुणाने सदर वृध्द इसमाचा गळा आवळून जीव घेतला. कोणताही ठोस पुरावा नसताना फरार आरोपीचा तातडीने शोध लावून नवा मोंढा पोलिसांनी आरोपीला गजाआड करण्यात मिळविलेले यश स्पर्हनीय असेच ठरले आहे.
लोकमान्य नगर वसाहतीमध्ये वास्तव्य करणारे दिलीप लक्ष्मणराव वैद्य हे ७३ वर्षीय इसम नजिकच्या कालव्याजवळ लघुशंका करीत होते. घटनास्थळी उपस्थित तरुणाने त्यांना याप्रकरणी हटकले असता त्या दोघांमध्ये प्रथम बाचाबाची झाली. नंतर शिवीगाळ झाली
त्याचाच राग मनात धरून त्या तरुणाने सदर वयोवृद्ध इसमाचा गळा आवळला. जीभ तोंडाबाहेर येवून वैद्य यांनी जीव सोडल्याचे निदर्शनास येताच त्या तरुणाने वैद्य यांना कालव्यातील पाण्यात फेकून दिले व तो घटनास्थळावरुन पसार झाला.
परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोणताही ठोस पुरावा नसताना या क्लिष्ठ प्रकरणाचा तपास लावून आरोपी धनंजय रमेशराव मानदळे (३०) याला तत्परतेने गजाआड केले. त्यांच्या या स्पर्हणीय कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मृतक व्यक्ती हे लोकमान्य नगरात तर आरोपी धनंजय मानदळे हा आशीर्वाद नगरात वास्तव्य करीत असल्याची नोंद पुढे आली आहे. दिलीप वैद्य हे हरविले गेल्याची तक्रार नवा मोंढा पोलीस ठाण्यात १२ जानेवारीला गुदरली होती. त्यानंतर बलसा शिवारात १४ जानेवारी रोजी आढळून आलेल्या मृतदेहाची पडताळणी केली असता तो दिलीप वैद्य यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ममतांचा गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अहवाल दिला.त्या अनुषंगाने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोणताही ठोस पुरावा नसल्याने आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांना आव्हानात्मक असेच ठरले होते.
जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सुधाराग आर. यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार निरनिराळी पोलीस पथके तैनात केली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोधकार्याला लागलेल्या तैनात पोलीस पथकांनी फरार आरोपीच्या शिताफीने झडप घालून मुसक्या आवळल्या. त्याला कोणतीही भीती न दाखवता विश्वासात घेऊन पोलीसी गनिमी काव्याने अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली देत घडलेल्या प्रकरणाचे वास्तव विषद केले. अवघ्या पाचच दिवसांच्या कालावधीत गुन्ह्याचे स्पष्टीकरण व लिप्त आरोपीचे गुन्हेगारीकरण ऊजागर केले. शिवाय आरोपीच्या मुसक्या आवळणे हे ज्या तत्परतेने सिद्ध केले ते खाकी वर्दीला साजेसे व भूषणावह असेच ठरले.
अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनीही याप्रकरणी दिलेल्या सूचना मौलिक ठरल्या. पोउनि. साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, यंकट कुसुमे, मारोती चव्हाण यांच्यासह ज्यांनी ज्यांनी या तपासकामी अथक परिश्रम घेतले, ते विशेष कौतुकास्पद असेच म्हणावे लागेल.


