दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कळकावाडी :- मौजे कळकावाडी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कळकावाडी येथे दिनांक २०/१/२०२३ रोज शुक्रवार पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरूवात होत असून सांगता दिनांक २७/१/२०२३ रोज शुक्रवारी होत आहे.सप्ताहातील दैनदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा आरती,७ ते १० गाथा पारायण,१० ते १२ गाथा भजन,१ ते ४ लक्ष्मण शक्ती अध्याय,४ ते ५ प्रवचन,६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ हरी किर्तन,१२ ते ४ हरी जागर होईल.दि.२०/१२०२३ रोजी सकाळी १० ते १२ श्री. निवृत्ती महाराज पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.माधव महाराज घागरदरेकर यांचे गुलालाचे किर्तन होईल.रात्री ९ वाजता ह.भ.प.रोहीदास महाराज कळकेकर यांचे किर्तन ,दि.२१ जानेवारी शनिवारी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कळकावाडीकर ,दि.२२ जानेवारी रविवारी ह.भ.प.तुळशीराम महाराज गऊळकर ,दि२३जानेवारी सोमवारी ह.भ.प.माधव महाराज पाताळगंगेकर ,दि.२४ जानेवारी मंगळवारी ह.भ.प.विठ्ठल महाराज दैठणेकर,दि.२५ जानेवारी बुधवारी ह.भ.प.भानूदास महाराज वांजरवाडेकर ,दि.२६ जानेवारी गुरूवारी ह.भ.प.नामदेव महाराज पेठवडजकर ,दि.२७जानेवारी शुक्रवार ह.भ.प.माधव महाराज घागरदरेकर यांचे सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन होणार आहे.भजनी मंडळी कळका,कागणेवाडी, बोरी बु,नावंदेवाडी,मंगनाळी,पेठवडज,नंदनवन,चुडाजीचीवाडी,टोकवाडी,आंबुलगा,देवईचीवाडी,हिब्बट,घागरदरा यांची उपस्थिती लाभणार आहे तरी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेऊन सहभागी व्हावे असे समस्त गावकरी मंडळी मौजे कळकावाडी ता.कंधार यांनी आवाहन केले आहे.


