दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील विनवळ,देहरे आणि न्याहाळे या आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता दहावी आणि बारावीच्या निवासी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ६,१३ आणि १७ जानेवारीला एक दिवसीय रक्तगट तपासणी व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन जय शैक्षणिक संशोधन संस्था संचलित जय पॅरामेडिकल कॉलेज जव्हार यांच्या माध्यमातून पार पडले.
या शिबिरामध्ये कॉलेजच्या ५१ विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी करून आश्रम शाळेतील जवळपास ८७९ मुले-मुली या मार्गदर्शन शिबिरात सहभागी झाले होते.जय पॅरामेडिकल कॉलेजचे प्राचार्य केशव गावंढा व उपप्राचार्य सुजाता गावंढा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात भविष्यात करिअर घडविण्याच्या दृष्टिकोनातून अनमोल माहिती देण्यात विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी पॅरामेडिकल कॉलेजचे सहशिक्षक तुषार महाला,अजय गिंभल,महेंद्र मिसाळ आणि आश्रम शाळेतील शिक्षक उपस्थित होते.


