दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील इनामी जमिनीचे हस्तांतरण व्यवहार नियमित करण्याचे व जमीन भोगवटदार ०१ मध्ये रुपांतरीत करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यास नागरिकांचा होणारा मानसिक त्रास कमी होईल, अशी मागणी आ. जितेश अंतापूरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात हैदराबाद इनाम निमुर्लन व रोख अनुदान कायदा १९५४ अन्वये प्रदान केलेले मदतनाश जमिनीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. शेती प्रयोजनकरिता विक्री परवानगीची गरज नसणे, विनापरवानगी अकृषिक वापर सुरू केलेल्या जमिनीचे हस्तांतरण नियमित करणे, कृषक जमिनी विना परवानगी विक्रीहस्तांतरणासाठी नियमित करणे तसेच अकृषि कारणासाठी परवानगी घेणे याबाबत स | परवानगी घेण्यासाठी तालुक्याती नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालया हेलपाटे मारावे लागतात तरीही का | होत नाहीत. विनाकारण खर्च तर होतो पण नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त जमिनीबाबतचे सर्व व्यवहार नियमित करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्याना दिल्यास नागरिकांची मोठया त्रासातून मुक्तता होईल तसेच त्यांची कामे मार्गी लागण्यास मदत होईल अशी अपेक्षा आ. अंतापुरकर यांनी व्यक्त केली.


