दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
निळेगव्हान :- मौजे निळेगव्हान ता.नायगाव येथे दिनांक २१ जानेवारी २०२३ रोज शनिवारी रात्री ९ ते १२ पर्यंत श्री.दशनाम दत्त आखाडा सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य यांचा निजात्मबोध ज्ञान चर्चा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संत, महंत, भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून निजात्मबोध ज्ञान चर्चेमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आयोजक श्री.दत्त संस्थान निळेगव्हान मठाधिपती गुरु आनंदबन गुरु उदत्तबन महाराज यांनी व समस्त गावकरी मंडळी निळेगव्हाण तालुका नायगाव खैरगाव जिल्हा नांदेड यांनी कळविले आहे.


