दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
हाळदा :- कंधार तालुक्यातील हाळदा येथे राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव व राजा भगीरथ जयंतीच्या निमित्त सकाळी ११ वाजता उस्माननगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.भारती साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपच श्री.हनंमतराव हाळदेकर होते दिवसभरात ७३ जनांनी रक्तदान केले. यावेळी अनुसया गोविंद पाटील शिंदे यांनी स्वतः येऊन रक्तदान केले व आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री गुरू गोविंदसिंग ब्लड बँक चे श्री.सोनकांबळे साहेब व सर्व स्टाफ यांच्या सत्कार करण्यात आला.
सायंकाळी ६:४० राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या शाखेचे अनावर संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.सचीन पाटील इंगोले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले तर संध्याकाळी ८ वाजता दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या वेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
किर्तनकार सौ आशाताई सुनील राऊत लातूरकर यांचा कीर्तन सोहळा पार पडला यावेळी आशाताईंनी आपल्याला माँसाहेब जिजाऊ , श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगिकारले पाहिजेत .माता भगिनींचे व देशसेवेसाठी सदा तत्पर असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.विविध विषयांवर अतिशय सुंदर किर्तन केले. यावेळी गावातील व बाहेर गावाहून मोठ्या संख्येने नागरिक व माता भगिनींची उपस्थिती होती वरील सर्व कार्यक्रमाला राजमुद्रा संस्थापक अध्यक्ष श्री.सचिन पाटील इंगोले ,प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री.सोपान पाटील कदम ,डॉ विजय वडजे साहेब ,डॉ श्री.गणेश पवळे साहेब, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बळीराम पाटील पवार , श्री.धनराज पाटील लुगांरे ,प्रहार जिल्हाध्यक्ष श्री.शंकर भाऊ वडेवार ,छावा तालुका अध्यक्ष श्री.संभाजी पाटील लाडेकर राजमुद्रा तालुका अध्यक्ष श्री.पिंटु येलेवाड , श्री.साईनाथ गोडबोले, जिल्हा सचिव श्री.श्रीकांत पाटील बस्वदे, श्री.बजरंग पाळेकर, श्री.विजय पिटलेवाड ,माजी प.स. सदस्य श्री.विजय मंदावाड, मा. उपसरपंच सचिन पाटील शिंदे , राजमुद्रा चे श्री.किरण गायकवाड श्री.गंगाधर मोरे , श्री.अनिल येरडे, श्री.चक्रधर शिंदे, श्री.प्रदिप पाटील शिंदे उपस्थित होते आभारप्रदर्शन राजमुद्राचे जिल्हाध्यक्ष तथा आयोजक श्री.शहाजी पाटील शिंदे यांनी केले व सर्वाचे आभार मानले.


