दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील गोळेगांव तपोवन मंदिर येथे प्रतिवर्षी प्रमाने याही वर्षी तपोवन मंदिर येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सदगुरू श्री. १०८ डॉ. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आशिर्वादाने गेले एकविस वर्षापासून परमरहश्य पारायण सोहळा व भॄगू रुशि भव्य यात्रेला 20 जानेवारी पासून सुरुवात होत आसुन पहाटे ५ते ६ शिवपाठ. सकाळी ६ते७ रुद्र अभिषेक ७ ते ९ परमरहश्य ग्रंथाचे पारायण. दुपारी १२ ते ३ मनमथ स्वामी गाथा भजन व सांयकाळी ५ते ६ प्रवचन व रात्री ९ ते ११ शिव किर्तन व नंतर शिवसागर व २७ जानेवारी पर्यंत नामवंत कीर्तनकार यांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. व शि. भ. प. चद्रकांत महाराज अमलापुरे गडगा. शि. भ. प. निळकंठ गुरुजी विभुते लातूर. शि. भ. प. संजय महाराज निंबाळकर. शि. भ. प. धनराज महाराज बुलबुले. शि. भ. प. अमोल गुरुजी लांडगे बनवस. शि. भ. प. राजेश्वर स्वामी लाळिकर. शि. भ. प. तानाजी महाराज थोटवाडीकर. या नामवंत कीर्तनकार यांच्या किर्तनाचा लाभ मिळणार आहे. व प्रवचनकार शि. भ. प. संतोष ग्यानबा ढाले. शि. भ. प. श्रीहरी पाटील कपाळे. शि. भ. प. मारोतराव गुरुजी कपाळे.शि. भ. प. ओमप्रकाश ढाले. शि. भ. प. साहेबराव पाटील कपाळे. शि. भ. प. राजु आप्पा गोळेगांवकर. शि. भ. प. मारोतराव आप्पा शिराळे. यांचे प्रवचन होनार आहे. व यामध्ये शिवपाठ. अभिषेक. परमरहश्य पारायण. प्रवचन. दुपारी प्रसाद व गाथा भजन शिव किर्तन व शिवसागर आदी सह या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी या अखंड शिवनाम सप्ताहाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. व या सप्ताहात निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाने२६ जानेवारी ते २७ जानेवारी दोन दिवस यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. व यात्रेला येणाऱ्या व्यापाऱ्यांची भोजनाची व सुरक्षेची जिमेदारी यात्रा कमेटिने घेतली आहे. तरी परीसरातील व्यापारी व नागरीकांनी सप्ताहात व यात्रेचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांच्या वतीने कळवण्यात येत आहे.


