दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-आदिवासीबहुल मेळघाटातील धारणी तहसील अंतर्गत असलेल्या कुटंगा परिसरात असलेल्या शासकीय रेशन दुकानात प्लॅस्टिकसदृश तांदूळ आढळून आल्याने परिसरातील आदिवासींना धक्का बसला.ग्रामस्थांनी तत्काळ याची माहिती येथील स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांना दिली.त्यानंतर आमदार पटेल यांनी धारणीचे तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना याची चौकशी करण्यास सांगीतले आणि त्यावर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
शालेय पोषण आहार योजनेसह सार्वजनिक पुरवठा या प्रणालीअंतर्गत शासकीय रेशन दुकानांना मोफत धान्य दिले जाते.त्यामधे गहू आणि तांदूळ यांचा समावेश आहे.
धारणी तालुक्यातील कुटंगा येथील शासकीय शिधावाटप दुकानातून मागील काही दिवसांपासून रेशनधारकांना वाटण्यात आलेला तांदूळ पूर्णपणे प्लास्टिकचा दाण्यासारखे होते आणि तांदळाचे दाणे देखील तुलनेने खूप जाड दिसत होते.हे पाहून आदिवासींना हा प्लास्टिकचा तांदूळ म्हणजे बनावट तांदूळ असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याबाबतची तक्रार त्या भागातील आमदार राजकुमार यांच्याकडे केली.
—————————————
कुटंगा गावातील रेशन दुकानात प्लास्टिकसदृश तांदूळ असल्याची माहिती काही आदिवासींमार्फत मिळाली होती.ज्यावर तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
🔸 राजकुमार पटेल,आमदार,मेळघाट
—————————————-
—————————————-
या प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.या तांदळाचे नमुने पाठवून त्यांची चाचणी केली जाईल.
🔸 प्रदीप शेवाळे,तहसीलदार, धारणी


