दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील वाकवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली , ही सोसायटी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यामुळे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत .
भूम तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व वरचेवर वाढू लागले आहे, पक्षीय संघटनात्मक शक्ती वाढू लागलेली आहे, यामध्ये वाकवड विविध कार्यकारी सेवा सोसायटी ही तालुक्यात लक्षवेधक आहे, या सोसायटीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे, उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या अंतिम दिवशी प्रत्येकी एक एकच अर्ज राहिल्यामुळे ही सोसायटी बिनविरोध झाली,
यासोसायटीवर भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत मासाळ यांच्या नेतृत्वा खालील पॅनलने वर्चस्व निर्माण करून संपूर्ण जागा बिनविरोध काढल्या आहेत . या सर्व नूतन संचालकांचा गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत .
नूतन संचालकामध्ये रोहिदास आबा मासाळ, चंद्रकांत गोकुळ मासाळ, प्रल्हाद भानुदास शेळके, बबन रामहरी देवकते , परमेश्वर रामकृष्ण माने, दगडू दादा मासाळ, सीताबाई शिवदास मासाळ, जोतिराम विठोबा फारणे, विठ्ठल शामराव शेळके, महादेव मालू मदने, आश्रूबा बाबा माने, वामन दगडू चंदनशिवे, सुरेखा युवराज अर्जुन , अरुणाबाई नवनाथ शेळके या नूतन संचालकांचा समावेश आहे.
वाकवड सेवा सहकारी सोसायटीचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मासाळ आणि त्यांच्या सर्व नूतन संचालकांचा भारतीय जनता पार्टीचे भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर , बालाजी बांगर, उपाध्यक्ष बाबासाहेब वीर, भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर, सरचिटणीस हेमंत देशमुख, सचिन बारगजे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष महबूब शेख , शहराध्यक्ष प्रदीप साठे, माजी नगरसेवक रोहन जाधव, चंद्रकांत गवळी, विधिज्ञ संजय शाळू , लक्ष्मण भोरे, संतोष अवताडे , सुजित वेदपाठक, संजय गायकवाड , भारतीय जनता पार्टी युवक तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, अंगद शिंदे आदींची उपस्थिती होती.


