दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी
कवी/लेखक इंद्रजीत पाटील यांना २०२३ या वर्षीचा उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला.सर्वद फाऊंडेशन,मुंबई यांनी हा पुरस्कार त्यांच्या हाती सुपूर्द केला.साने गुरुजी विद्यालय,दादर-मुंबई या ठिकाणी दुपारी २.०० वाजता भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्रीराम दांडेकर,प्रमुख पाहुणे मा.हनुमंत हेडे तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक मा.अशाेक बागवे सर यांची उपस्थिती हाेती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदर फाऊंडेशनच्या संचालिका डाॅ.सुचिता पाटील यांनी केले. संचालक श्री.आेंकार देशमुख यांनी उपस्थित मान्यवर आणि सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे स्वागत केले.तर परेश घाणेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिळालेल्या या पुरस्कारामुळे कवी/लेखक इंद्रजीत पाटील यांचे साेलापूर जिल्ह्यात विशेष काैतुक हाेत आहे.
साेलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक मारूती कटकधाेंड,राजेंद्र भोसले,वंदना कुलकर्णी,देवेंद्र आैटी,रामप्रभू माने तसेच बार्शीचे साहित्यिक डाॅ.सुनिल विभुते,आबासाहेब घावटे व त्यांचे मित्र संजय भड,अमाेल देशमुख,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील यांनी अभिनंदन केले आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


