दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलुर – देगलूर तालुक्यातील खानापुर फाटा येथे खानापुर जि. प. सर्कल कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकारी देगलूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर (माजी सभापती पं. स. देगलूर) तसेच खानापुर जि. प. गट प्रमुख पदी विश्वनाथ नारायणराव ताडकोले, खानापुर पंचायत समिती गण प्रमुख श्याम पाटील कोकणे सावरगावकर, वन्नाळी पंचायत समिती गण प्रमुख मारोतीराव हाणेगावे चैनपुरकर व सावरगाव सरपंच पदी पक्ष समर्थक सचिन जाधव पाटील यांची निवड झाली कारणे अभिनंदनपर सत्कार सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नांदेड जि. प. शिक्षण समिती माजी सभापती माधवराव मिसाळे गुरुजी शेळगावकर, स्वागताध्यक्ष स्थानी इब्राहीमपुर सरपंच बालाजीराव बामणे पाटील हे होते. तसेच प्रमुख पाहुणे नांदेड जि. प. समाज कल्याण माजी सभापती रामरावजी नाईक साहेब, नांदेड काँग्रेस कमिटी सचिव दीपक जी शहाणे, देगलूर तालूका काँग्रेस माजी अध्यक्ष प्रितम देशमुख साहेब, प्रशांत अन्नाराव पाटील आचेगावकर, ताराकांत पाटील नरंगलकर, सय्यद अहमद पटेल तसेच बागन टाकळी सरपंच विष्णुकांत सोनकांबळे हे होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडितजी वाघमारे खानापुरकर यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी सर्कल मधील खानापुर, तडखेल, सुगाव, कावळगड्डा, आल्लापुर, ईब्राहीमपुर, मनसक्करगा, सावरगाव, लख्खा, अंतापुर, वन्नाळी, वझरगा, तुपशेळगाव, कोटेकल्लुर, लिंबा, रामपुर, हनुमान हिप्परगा, सुंडगी, चैनपुर, हावरगा, मुजळगा, बागनटाकळी व देगाव येथील काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता जनार्दन व संबधित मित्र परिवार असे असंख्य लोक उपस्थित होते. या यशस्वी कार्यक्रमामुळे पक्ष कार्यकारीणी व कार्यकर्ते यांच्यामध्ये हत्तीचे बळ वृद्धिंगत झाले असूनकार्यतत्परता, कर्तव्यदक्षता, सहकार्यभावना, संघटनात्मक एकता, तेज, उत्साह, प्रेम आपुलकी, एकनिष्ठता असे अनेक गुण वाढ झाले असल्याचे निदर्शनास आले.


