दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
अर्धापूर : भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने आजादी की मशाल यात्रा चे आयोजन दिनांक 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील सर्वमहाविद्यालयात जात आहे.
या यात्रेचे अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी आज आगमन झाले. महाविद्यालयाच्या गेटवर यात्रेचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. प्राचार्य डॉ. के. के. पाटील यांच्या हस्ते मशाल घेण्यात आली. महाविद्यालयाच्या गेट पासून मुख्यस्थळी मशाल नेण्यात आली. कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी राष्ट्रीय ऐक्याची प्रतिज्ञा सर्वांना देण्यात आली.व राष्ट्रगीत गाऊन समारोप करण्यात आला.
रॅलीमधील सहभागी स्वयंसेवक यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के .पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पंजाब शेरे, डॉ. माधव जोशी, डॉ व्यंकटेश मदनुरे, डॉ प्रकाश शिंदे या मान्यवर प्राध्यापकांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी भारत माता की जय, वंदेमातरम या घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य के.के. पाटील होते.कार्यक्रमाचे संयोजन समितीचे प्रमुख डॉ.विक्रम कुंटुरवार ,संयोजन समितीचे सदस्य प्रा रघुनाथ शेटे, रासेयो कार्यक्रमाधिकारी, डॉ. एस. जी. बिराजदार,डॉ. साईनाथ शेटोड, डॉ.विलास चव्हाण,डॉ सारिका औरादकर ,डॉ. नजम ,डॉ जे सी पठाण ,डॉ.राजेश पाटील, गायकवाड बी. के. डॉ.रत्नमाला मस्के डॉ के के कदम,डॉ विशाल बेलुरे,प्रा माधव टेम्भुरने, प्रा राजेगोरे, यांची उपस्थिती होती.
यात्रेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ रघुनाथ शेटे, डॉ सोमनाथ बिराजदार , यांनी विशेष परिश्रम घेतले.मारुती शिंदे, बालाजी पंदिलवाड, सदाशिव शिंगारे, बालाजी काकडे, यांनी विशेष साहाय्य केले.


