दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- समाजामध्ये वावरत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे दान करीत असतो. दानशुरांची संख्याही समाजात कमी नाही.आयोजक शहाजी पाटील शिंदे यांनी घेतलेला उपक्रम हा कौतुकास्पद आहे.रक्तदान देऊन आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो . तेव्हा तरूणांनी रक्तदान करून त्या व्यक्तींचे अनमोल प्राण वाचवावेत ,कारण रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचे हाळदा येथील आयोजित केलेल्या जिजाऊ जन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबिरात उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनि पांडुरंग भारती यांनी प्रतिपादन केले.
हाळदा ता.कंधार येथे राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्राची जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व राजा भगीरथ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये सकाळी ११ वाजता. रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराचे उद्घघाटन उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनि पांडुरंग भारती यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हानमंतराव हाळदेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून.गावातील प्रतिष्ठीत नागरीक , गुरू गोविंदसिंग ब्लड बँक नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी व सोनकांबळे सह कर्मचारी यांची उपस्थिती होती.यावेळी गावातील महीला अनुसया गोविंदराव पाटील शिंदे यांनी स्वयंस्फुर्तीने पुढं येऊन पुरूषांच्या बरोबरीने रक्तदान केले.जवळपास ७४ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला .यास तरुण व महीलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.सर्वप्रथम मान्यवर व ब्लड बँक च्या सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
सायंकाळी ६ :३० वा. राजमुद्रा संघटनेच्या शाखेचे अनावरण संस्थापक अध्यक्ष मा.सचिन पाटील इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व पदाधिकारी , मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर रात्री ८ वाजता. किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी उपस्थित पाहुण्याचा स्वागत सत्कार करण्यात आला. किर्तनकार ह.भ.प. सौ. आशाताई सुनील राऊत लातूरकर यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन केले.याप्रसंगी ह.भ.प. सौ.आशाताई लातूरकर म्हणाले की , राजमाता जिजाऊ ह्या अर्थतज्ज्ञ होत्या. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या.शस्त्र चालविण्यात पारंगत होत्या.स्वराज्य मिळवण्यासाठी स्व:ताच मातृत्व राष्ट्रला अर्पण


