 
                दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नागपूर – नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांची केमिस्ट बांधवांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी हल्लाबोल आंदोलन तसेच ऑनलाइन माध्यमातून होत असणारी अनिथिकल स्पर्धा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केमिस्टच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटल्या नाही तर आंदोलनात्मक भूमिकेबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी केमिस्ट बांधवांना व्यवसायात अडचणी येणार नाही या दृष्टीने राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल याचे आश्वासन दिले.
यावेळी राज्य संघटनेचे खजिनदार वैजनाथ जास्टे, सहसचिव प्रसाद दानवे, उपाध्यक्ष मुकुंद दुबे, धनंजय जोशी, श्रीकांत दुबे, फार्मसी कौन्सिल अध्यक्ष विजय पाटील यांची आवर्जून उपस्थिती होती.



 दैनिक चालु वार्ता
                                        दैनिक चालु वार्ता                     
                 
                 
                