दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव – संभाजी पुरीगोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप नगरीमध्ये आणि गावाच्या भूमीमध्ये पावन झालेल्या जागृत देवस्थान आणि आपल्या सर्वांचे ग्रामदैवत श्रीनाथ साहेब चवणेश्वर महाराज महर्षी चवन ऋषी सुकन्या माता यांच्या कलशारोंहणानिमिंत्त चवणेश्वर समिती व करंजखोप ग्रामस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले आहे. परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज अण्णा (श्रीक्षेत्र.नारायणपूर ) यांच्या हस्ते कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याबाबत चवणेश्वर समिती आणि करंजखोप ग्रामस्थांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन कार्यक्रमांची रुपरेषा पुढील प्रमाणे दिनांक २५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता युवा प्रसिद्ध माहिला कीर्तनकार ह.भ.प. नेहाताई भोसले-साळवेकर ( पुणे ) यांचे सुश्रांव्य कीर्तन होईल. वार. गुरुवार दिनांक २६ जानेवारी च्यवन ऋषी आणि सुकन्या माता यांची मूर्तीची भव्य मिरवणूक सोहळा.वार. शुक्रवार दिनांक २७ जानेवारी रोजी मुख्य दिवशी कार्यक्रम होम,हवन आणि कलशारोहणाचा कार्यक्रम परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज अण्णा (श्रीक्षेत्र नारायणपूर ) यांच्या हस्ते संपन्न होईल. तसेच सायंकाळी सप्तरंग भजनी मंडळ सर्जापूर यांचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी गावातील माता-बहिणी तसेच माहेरवासिनी यांच्यासह पंचकोशीतील भाविक भक्तांनी उपस्थिंत राहावे असे आवाहन चवणेश्वर समिती व करंजखोप ग्रामस्थांकडून करण्यांत आले आहे.


