
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
माणुस हा खुपचं विचित्र प्राणी आहे.आजारी असला कि वैद्य किंवा दवाखाना शोधतो.भौतिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी मंदिर संत चमत्कार शोधत असतो .पण जीवनाचा खरया अर्थाने उद्धार होईल असे संत आपल्याला लवकर समजतं नाहीत सापडत नाहीत हे संतांचं नाही तर आपलं दुर्भाग्य आहे. सत्य हे समजण्यासाठी उमजण्यासाठी पचण्यासाठी कठिणच असतं .या उलट असत्य खुप लवकर समजतं खुप लवकर उमजत पचण तर क्षणात होऊन अंगवळणी पण पडतं .महणजे बाब कोणतीही असेल सत्य आणि असत्य या नुसारच त्या बाबीच महत्व अभाव प्रभाव असतो .पण तो समजण्यासाठी अगोदर फरक समजण गरजेचं असतं.आस्था श्रद्धा,हि वेगळी असते .त्याला निस्वार्थ भाव हि जोड असते .हेतु उदेश मग तो कोणाताही असेल लाभ , स्वार्थ भिती या पैकी येणकेन कोणतही कारणाने आपण जेव्हा मंदिर शोधतो कि संत शोधतो तेव्हा त्या भिती पोटी मंदिरात जाण वेगळं काही अपेक्षा डोक्यात असणं संकटं समोर उभा असण किंवा संकटाची अडचणीची चाहुल लागण अशा आपल्या कडे असणार्या सर्व शक्तिचा प्रभाव अपुरा पडला कि आपण दैव शक्ति शोधतो . दैव शक्ति शोधताना मग मंदिरा समोरच सोबतच आपल्याला आपली समस्या अडचण क्षणार्धात सुटेल असे संत अपेक्षित असतात . यातुनच आपण चमत्काराची अपेक्षा बाळगतो . मुळात जीवनाचा खरया अर्थाने उद्धार होईल असे संत आपल्याला लवकर सापडत नाहीत आणि सापडले तर कळत नाहीत आणि कळले तर पचत नाहीत हिच विद्यमान युगाची खुप मोठी दुर्भाग्य पुर्ण स्थिती आहे. कर्म भोग या सृष्टी वर कोणालाही चुकणार नाहीत जसं कर्म तसं फळ आणि याच दरम्यान कर्म करताना काळा आपला साथीदार असतो . जीवनाच्या मार्गावर अनेक भौतिक सेवा सुविधा अर्जित करताना अनेक इच्छा पुर्ण होऊ शकतात अनेक इच्छा अपुरया राहु शकतात आणि भौतिक जीवनातील संसाधन निर्माण करण्यासाठी आपण अनेकदा अध्यात्माशी जोडले जाते.तर अनेक अपयशाचा सामना केल्यानंतर आपल्याला चमत्काराची अपेक्षा असते तेव्हा आपण या बाबींशी जोडले जातो.एखादी आपल्या जीवनातील घटना घडामोड हि घडणारच असते .पण एवढा संयम आपल्याकडं नसतो . ज्याठिकाणी आपल्याला संयम आणि आश्वासन आणि आशिर्वाद मिळतात याला आपण चमत्कार समजतो . वास्तविक मंदीर कोणतही असु द्या त्या ठिकाणी प्रचंड सकारात्मक उर्जा असते .संत कोणतेही असतील त्यांच्या कडे प्रचंड अशी सकारात्मक शक्ति असते . नकारात्मक कोणत्याही शक्तिला वाव नसतो . त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी आपण खूप मोठ्या आशेने पोहचल्यावर आपल्या इच्छा योगायोगाने पुर्ण होतात . इथं पर्यंत आक्षेपार्ह कहीच नाही .पण दैनंदिन श्रद्धेला जेव्हा चमत्कारांचे भास होतात आणि आपलं जीवन बदल पाहिजे,पैसा सत्ता संपत्ती प्रतिष्ठा, नावलौकिक यासाठी ,देवाचे आशिर्वाद किंवा संत कृपा झाली पाहिजे.मग इथूनच एक वेगळा प्रवास सुरू होतो आणि हा स्वार्था ने सुरु झालेला प्रवास एक वेळी एका बिंदूवर येऊन थांबतो .आणि तिथुनच मग वेगळी ठिणगी पडते .आणि त्याला वादाची फसवणुकीपासून अनेक आरोप प्रत्यारोपाची किनर लागते . पण मुळात आपल्याला काय शोधन गरजेचे आहे आणि आपण काय शोधतोय आपण जे शोधतोय ते आपल्याला तसंच मिळणार आहे. आपला मुळात शोध चुकीचा आहे आणि चुकीच्या मार्गाने पद्धतीने आपण योग्य मार्ग शोधतोय हे गणित स्वप्नात सुद्धा जुळणयासारख नाही ते आपण वास्तवात जुळतोय म्हणजे आपण किती विद्वान ज्ञानी पंडित आहेत. मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे समजलं पाहिजे आणि संत हे आपल्याला आपल्या जीवनाची खरी ओळख करून देतात . आणि जीवनाचा आत्म उध्दार होण्यासाठी मार्गदर्शन करत असतात.पण सध्या माणसं आर्थिक सुबत्ता आणि जीवनातील समस्या यासाठीच जास्तीत जास्त आकर्षित होत आहेत आणि इथुनच नविन धार्मिक युग निर्माण होत आहे. या नवयुगात कही घटना घडामोडी वेगवेगळ्या पद्धतीने घडु शकतात याचं अर्थ अध्यात्म आणि संत परंपरा हि चुकीची नाही तर मुळात आपण चुकीच्या ठिकाणी पोहचता कामा नये .मुळ अध्यात्म हा प्रांत वेगळा आहे .हे सर्व सामान्य लोकांना कळल्याशिवाय खरं संत कळणार नाहीत आणि सापडणार पण नाहीत. पण वास्तविक गरज हिच आहे कि खरे संत समजले पाहिजेत कळले पाहिजेत
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301