
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- कंधार तालुक्यातील नंदनवन येथील नदिवरील पुल मागील ढगफुटी सदृश पावसाने वाहुन गेला होता.याची दखल घेऊन दैनिक चालु वार्ता पेपर व सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून बोलून निवेदन देऊन पुलाचे बांधकाम करून देण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला होता. पुलाच्या बांधकामासाठी लोकप्रतिनिधींना इशारा दिला होता की पुलाचे बांधकाम करा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत यांचे परीणाम भोगावे लागतील या इशार्याचा परीणाम लोक प्रतिनिधी यांनी गंभीर स्वरूपात घेऊन कामाची मंजूरी देण्यात आली असून. लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव तसेच दैनिक चालु वार्ता पत्रकार बाजीराव गायकवाड यांनी बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे.दैनिक चालु वार्ता पेपर मुळे कामाला सुरुवात करण्यात आली आहे .पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे अशी प्रवाशांनी विनंती केली आहे .लोकप्रतिनिधी यांचे योगदान महत्त्वाचे असुन. त्यांचे ही नागरिकांनी आभार मानले आहेत.तसेच बामणी पाटी रस्त्याची दुरवस्था झाली असून वनविभागाच्या ताब्यातील रस्ता लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.