
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथे 09/02/2023 :मा. एकनाथराव शिंदे यांच्या वाढ दिवसा निमित्त डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक देगलुर येथे डॉ. सुनील जाधव यांनी ये मालिक तेरे बंदे हम गीत गाऊन भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर , औषधी वाटप , रक्तदान शिबिर व साड्या वाटप कार्यक्रम सकाळी दहा ते पाच पर्यन्त संपन्न झाला .या वेळी डॉ. सुनील जाधव , डॉ. राहुल मनधरने , डॉ . उस्मान , डॉ. जय गवळी , डॉ.संकेत जाधव , डॉ.संजय लाडके यांनी साडे चारशे हुन अधिक रूग्ण तपासणी केली सर्व रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली .या वेळी समुपदेशक छाया पाटील , एस . कुमार , जयश्री बाबळे , अहेमद शेख यांनी सहकार्य केले रक्त दान शिबिरात सत्तावीस पुरुष व महिला यांनी रक्त दान केले मोठ्या संख्येने आलेल्या गरजू गरीब महिला भगिनीना घाळप्पा आंबेसंगे , वेंकट पुरमवार , डॉ.सुनील जाधव , सोनु रोयलावार, बालाजी पा. नागराळकर , संतोष भुपतवार , राजेश्वर शेट्कार , सुरे चीलोरे हस्ते मोफत साड्या वाटप करण्यात आले या कार्यक्रमास डॉ.शिवशंकर वलाण्डे, अशोक गन्दपवार , अशोक कांबळे , नर्सिंग अन्नमवार सह शेकोडेसर्व समाज , पक्षाच्या बंधु भगिनीची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीते साठी बाळासाहेबांची शिवसेना चे तालुका प्रमुख घाळप्पा आंबेसंगे , शहर प्रमुख वेंकट पूरमवार , उप शहर प्रमुख सोनु रोयलावार , बालाजी पा. नागराळकर , संतोष भुपतवार , राजेश्वर शेट्कार , सुरे चीलोर व डॉ. सुनील जाधव , बालाजी शिंदे गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड यांनी कार्य केले व मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडले .