
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:भारत देश हा कृषी प्रधान देश असून शेतकरी हा या देशाचा राजा आहे परंतू काही वर्षापासून माझ्या शेतकरी राजाला हवामानाचा अंदाज चुकीचा मिळत असल्यामुळे या देशाचा शेतकरी आर्थिक नुकसानीत येत आहे. परंतू आता अशाप्रकारे कधीत होऊ देणार नाही मी किमान इ.स. २०३२ पर्यंतचा हवामानाचा अंदाज घेऊन ठेवला असून माझ्या शेतकरी राजाला कधीच आर्थिक नुकसान होऊ देणार नसल्याचे सांगत दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी देगलूर येथील गोविंद माधव मंगल कार्यालय येथे शेतकरी व महिला बचत गटांचा एकदिवशीय महामेळावा आणि भव्य रोजगार मार्गदर्शक मेळाव्यात पंजाबराव डख सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले.
यावेळी शेतकरी व महिला बचत गटाचा महामेळावा आणि भव्य रोजगारमार्गदर्शन शिबीर या कार्यक्रमाला
अध्यक्ष म्हणून श्री सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत, मा. रवीशंकर चलवदे जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी नांदेड, दिलीप दम्म्यावार जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड, नांदेड, विनोद रापतवार जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड, इंगळे साहेब, प्रविण खडके व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड, सोमेश्वर गिरी तालूका कृषी अधिकारी देगलूर, बालाजी मिठेवाड नायब तहसिलदार देगलूर, गंगाराम इरलोड मुख्याधिकारी
परिषद देगलूर व पंचायत समिती सदस्य परिसरातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते, तर या कार्यकमाच्या अनुशंगाने शुन्यातून उद्योग विश्व उभा करणारे नामवंत दत्तात्रय इंगळे पाटील खुतमापूर, बालाजी इबितवार, मारोती बजिरे लिंगनकेरूर, भानूदास पेंडकर, शिवकुमार गाजले अशा मान्यवरांचा याठिकाणी सत्कार करण्यात आलेपुढे बोलताना सांगितले की, तुम्ही हवामान खात्याचा अजिबात चिंता करू नका तुम्हाला कोणतीहीअडचन असेल तर मला फोन करा किंवा मॅसेज करा असे सांगत सर्व जनतेस आपला मोबाईल नंबर दिला. यावेळी सोयाबीन पेरणी कशी करायची, कापूस लागवड कशी करायची, या सर्व पिकांची लागवड कधी व कशा पद्धतीने करायची आहे यावेळी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी व अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सिद्धदयाळ शिवाचार्य महाराजांचे आशिर्वचन लाभले तर सूत्रसंचलन कैलास येसगे व विश्व परिवाराच्या वतीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.