दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले.
लातुर/अहमद्पुर: तालुक्यातील छोटयाशा नरवटवाडी या। पन्नास शंभर घराच्या वाडीतील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या विलास बळीराम नरवटे या शेतकरी पुत्राने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एन टी सी प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम रँक मध्ये येऊन जगा समोर आदर्श ठेवला आहे.
विलास नरवटे हा लहानपणापासूनच हुशार मुलगा होता अस त्याच्या प्राथमिक पर्यंत शिकवलेल्या शिक्षकांनी सांगितलं.चौथी पर्यंतच प्राथमिक शिक्षण नरवटवाडी येथे घेतल्यानंतर माध्यमिकच जवहार नवोदय वसमत येथून घेतलं तिथेपण प्रथम क्रमांक मिळवुन् पुढे श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग च शिक्षण घेतलं कुठे पण नोकरी करू शकले असते पण ध्येयानी झपाटलेली माणस साध्या यशाला यश मानतच नाहीत त्यांची यशाची व्याख्या वेगळीच असते .सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एल एल बी गोल्ड मेडल,तसेच त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे.आणी 2016 साला पासून स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनायच अस ठरवलं .2020 साली दिलेल्या परीक्षेत सहायक निबंधक पदी राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती झाली तेवढ्यावर न थांबता 2021 साली झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एन.टी.सी.प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम रँक मध्ये येऊन उपजिल्हाधिकारी पदी निवड करण्यात आली.त्यांनी मिळवलेलं यश हे अहमद्पुर तालुक्यातील नाहीतर पूर्ण महारष्ट्रातील मुलानं साठी प्रेरणा देणार आहे.विविध स्तरातील मान्यवर तसेच मित्र,नातेवाईक या सर्वाकडून त्यांच्या वर कौतुक आणी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
