
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनीधी-विष्णु मोहन पोले.
आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये नॅशनल सायन्स डे साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम क्षीरसागर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम, ज्योती मॅडम, पिटाले सर होते तसेच नर्सरी ते युकेजी च्या विद्यार्थ्यांनी नॅशनल सायन्स डे या शब्दाचा पोशाख प्रदान केला आणि काही विद्यार्थ्यांनी फ्रुट्स चा युनिफॉर्म प्रदान केला आणि पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट स्वरूपात विविध प्रकारचे सायन्स प्रोजेक्ट तयार केले त्यातूनच मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजवण्यात आला आणि भारतातील वैज्ञानिक सी. वी .रमण यांच्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी भाषण केले आणि काही विद्यार्थ्यांनी सी .वी. रमण बद्दल माहिती जमा करून निबंध स्वरूपात लिहून आणले या सर्व कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न सर्व शाळेतील शिक्षकांनी केला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण मॅडम यांनी केले आणि या कार्यक्रमाचे आयोजन कृष्णापुरे मॅडम आणि कुलकर्णी मॅडम आणि विज्ञान विषयाच्या प्रमुख ज्योती मॅडम कारभारे मॅडम यांनी केले या कार्यक्रमात मुलांचा उत्साह आनंदमय होता यातून मुले आपल्या भविष्यात नक्कीच प्रेरणादायी प्रयोग बनवतील आणि शास्त्रज्ञ बनतील असे आपल्या भाषणातून मुख्याध्यापक श्रीराम क्षीरसागर सर यांनी सांगितले आणि विज्ञान प्रदर्शनात मॉडेल इंग्लिश स्कूल या शाळेने लगातार तीन वेळेस राज्यस्तर पर्यंत भाग नोंदवला याची पण मुलांना माहिती सांगितली आभार प्रदर्शन कुलकर्णी मॅडम यांनी मांडले आणि नॅशनल सायन्स डे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट पाहण्यासाठी शाळेतील पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता सर्व पालकांनी विद्यार्थ्यांची कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.