
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे”” घनकचरा व्यवस्थापन व गांडूळ खत निर्मिती”या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा मंगळवार (दि.28)रोजीआयोजित करण्यात आले विज्ञान दिनानिमित्त वनस्पतीशास्त्र विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे होती याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अभय शिंदे ( व्यंकटेश महाजन कनिष्ठ महाविद्यालय धाराशिव ) हे होते. या कार्यक्रमासाठी विज्ञानवारी या उपक्रमांतर्गत विद्याभवन हायस्कूल कळंब. येथील विद्यार्थी यांना प्रशिक्षण व विज्ञान विषयक जागृती निर्माण करण्यास आली. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर बॉटनी असोशियनचा विद्यार्थी अनिल वाघमोडे याची सकाळ यिन या संस्थेने पर्यटन व वातावरणातील बदल मंत्री निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . प्रा. अभय शिंदे यांनी सेंद्रिय शेती करिता गांडूळ खताचे महत्त्व पटवून दिले गांडूळ खताच्या वनस्पतीसाठी लागणारी अन्नद्रव्ये संपर्क संयुक्त जिवाणू असून वनस्पतींचे रोग प्रतिकारक क्षमता वाढवते गांडूळ खत हा शेतीतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याची मार्केटिंग कशी करायची याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरिक गुणवत्ता अश्वासन प्रकोष्ट समन्वयक डॉ. कमलाकर जाधव सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. अर्चना मुखेडकर मॅडम यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. श्रीकांत भोसले सर व नियोजन डॉ. विश्वजीत मस्के यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे ऑनलाईन प्रदर्शन करण्यासाठी श्री अरविंद शिंदे व संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी डॉ. प्रोफेसर ज्ञानेश्वर चिंते, डॉ. नामानंद साठे ,डॉ. महाजन ,डॉ. पावडे , प्राध्यापक शहारुप शेख हे उपस्थित होते.ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बॉटनी असोसिएशन आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती जया पांचाळ,हनुमंत जाधव,उमेश लबाड ,आदित्य मडके यांनी मदत केली.