
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची ‘एक्सकलुसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड ‘ मध्ये नोंद कळंब शहरातील श्रीमंतयोगी युवा मंच कळंब या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या शिवजन्मोस्तव सोहळ्या निम्मित शिवरायांना मानवंदना म्हणून साकारलेल्या 23800 चौरस फूट आकाराच्या भव्य दिव्य अश्या कोलाज पेटिंग ची ‘एक्सकलुसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड’ म्हणून नोंद झाली आहे, त्यामुळे कलाकार राजकुमार कुंभार व श्रीमंतयोगी युवा मंच कळंब यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कळंब येथे मागच्या काही वर्षात शिवजयंती एका सना प्रमाने साजरी केली जाते .या निमित्ताने श्रीमंतयोगी युवा मंच ,कळंब या मंडळाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोस्तव निम्मित भव्य दिव्य अशी शिवरायांची कोलाज पेटिंग च्या माध्यमातून प्रतिमा साकारण्याचा संकल्प केला होता .यानुसार कळंब तालुका कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंतयोगी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अॅड.राहुल पांडुरंग कुंभार यांचा हा संकल्प शिराढोन येथील कलाकार राजकुमार कुंभार यांनी तडीस नेला होता.
श्रीमंतयोगी युवा मंच च्या संकल्पानुसार त्यांनी वेस्टेज बॅनर ,काळया आणि पांढऱ्या कलरचा 25 किलो रंग व 125 किलो रद्दी पेपर चा वापर करत 23800 चौरस फूट आकारात शिवरायांची प्रतिमा साकार केली होती ,ही प्रतिमा साकारण्यासाठी सलग 32 तासात पूर्ण केली .
आता या उपक्रमाची सध्या ‘एक्सकलुसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली असून लवकर च या च प्रतिमेची नोंद गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा होणार आहे त्याची प्रक्रिया चालू आहे असे श्रीमंतयोगी युवा मंच ,कळंब चे अध्यक्ष अॅड.राहुल पांडुरंग कुंभार यांनी सांगितले आहे.
श्रीमंतयोगी युवा मंच कळंब च्या वतीने 2018 साली शिवजयंती निम्मित छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळी च्या माध्यमातून 19200 चौरस फूट आकारात कलाकार राजकुमार कुंभार यांच्या कडून साकारण्यात आली होती त्या महारांगोळी ची देखील नोंद ‘एक्सकलुसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली होती.