
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार: महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांच्या वतीने श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दीना निमित्ताने त्यांच्या अनुयायांनी श्री सदस्यांनी संपूर्ण भारतभर महास्वच्छता अभियान राबविले.या अभियानात जव्हार शहरातील विविध शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ करून शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अभियानात जव्हार नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेत मोलाचा हातभार लावला.या महास्वच्छता अभियानात श्री सदस्यांनी स्वतः आपल्या हातात झाडू घेऊन शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय,प्रांत,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तहसील,नगरपरिषद,शासकीय दवाखाना,न्यायालय,तलाठी,पंचायत समिती अशा विविध शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला.जव्हार तालुक्यातील २५० च्या आसपास श्री सदस्यांनी एकत्रित रित्या येऊन केलेल्या या महास्वच्छता अभियानाने स्वच्छतेचा एक नवा आदर्श त्यांनी समाजासमोर उभा करून दिला आहे.