
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन हॉलमध्ये लोहा तालुक्याचे सन्माननीय सरपंच व ग्रामसेवक यांची नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीला श्री अभिजीत राऊत साहेब जिल्हाधिकारी, नांदेड, श्री डॉक्टर अविनाश पोळ सर प्रमुख मार्गदर्शक ,पानी फाउंडेशन,जिल्हा कृषी अधीक्षक श्री चलवदे सर, प्रांताधिकारी श्री माने सर, लोहा तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री व्हावळे सर व अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संतोष शिनगारे विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन, यांनी केले.
सुरुवातीला शेलगाव धानोरा येथील सरपंच श्री मारोतराव कदम यांनी त्यांचे गतवर्षीच्या फार्मर कप स्पर्धेचे अनुभव सांगितले.
श्री डॉक्टर अविनाश पोळ सरांनी आपल्या शैलीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023 बद्दल माहिती दिली.
ओरेगाना युनिव्हर्सिटीचे यांड्रीव मिल्सन यांनी पाणी फाउंडेशन च्या कामाची घेतलेली दखल ते फार्मर कप स्पर्धा 2023, या स्पर्धेमुळे झालेले गट व त्या गटांचे झालेले फायदे अनेक गटांचे उदाहरण देऊन डॉक्टर साहेबांनी *सांगितले
यावेळी डॉक्टर साहेबांनी कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ श्री बेग सर, श्री पांडागळे सर व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले आपला लोहा तालुक्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून कापूस संशोधन केंद्र आपल्या नांदेडमध्ये आहे त्याचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा असे सांगितले
माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्वांना मार्गदर्शन केले फार्मर कप स्पर्धेत सहभाग घ्या, प्रत्येक गावातून पाच व्यक्ती प्रशिक्षणाला पाठवा, मी स्वतः व माझ्या पत्नीने ही पानी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेतल्याचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले
लोहा तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी आपल्या गावातून तीन पुरुष व दोन महिला प्रशिक्षणाला पाठवावेत असे आवाहन जिल्हाधिकारी साहेबांनी केले.
तसेच ग्रामपंचायत यांनी सत्यमेव जयते फार्मरकप स्पर्धा 2023 मध्ये नोंदणी करण्यासाठी खालील लिंक https://cutt.ly/fc2023-gaav-nondni वर जाऊन आपल्या ग्रामपंचायतची नोंदणी करावी असेही आव्हान केले.
या वर्षाच्या फार्मर कप स्पर्धेत लोहा तालुक्यातील सर्व गाव घेऊ शकतात सहभाग.. डॉ.अविनाश पौळ, प्रमुख मार्गदर्शक, पानी फाउंडेशन