
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर : मनीषा शिंदे मृत्यू प्रकरणात स्पष्ट अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार डॉ .ठक्करवाड हे मृत्यूस दो Rxषी जबाबदार असल्या कारणाने त्यांच्यावर भा.द.वि. ३०४ (अ)अन्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे .
निष्पाप मनीषा शिंदे यांचा बेजबाबदार डॉक्टर मुळे मृत्यू झाला असल्या प्रकरणी *का.मनिषाताई यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या नराधम डॉ. ठक्करवाड यांना तात्काळ निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आपल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती तसेच दि.30 डिसेंबर रोजी शहरात सर्व पक्षीय नेते व समाज बांधव तालुक्याचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या तर्फे देगलूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता . त्यामुळेच येथील उपजिल्हा रुग्णालय प्रशासन तथा पोलीस प्रशासनावर दबाव आला , आणि या एकजुटीमुळेच डॉ. ठक्करवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .देगलूर शहरात डॉ. ठक्करवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याने देगलूर शहरातील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला असून बेजबाबदार डॉक्टरांवर कार्यवाही झाली असल्याने बेबंद डॉक्टरशाहीस व उपजिल्हा रुग्णालयातील सुस्त प्रशासनावर आता लगाम बसणार. असे आश्वासन देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी सांगितले