
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथील दीपक कुंडलिक राठोड हा विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023 – 24 साठी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय सैनिकी शाळा परीक्षेत पात्र झाला आहे. दीपकच्या या यशाबद्दल तांड्याचे नायक भास्कर राठोड,आशिष राठोड,प्रा राम राठोड,पंडित राठोड,संजय राठोड,जगदीश राठोड,हरी चव्हाण,राजेश राठोड,ओमकार जाधव,राम चव्हाण आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.