
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी अहमद्पुर-विष्णु मोहन पोले.
लातुर/अहमद्पुर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एन टी सी प्रवर्गातून प्रथम रँक मध्ये आलेले आणी उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल विलास बळीराम नरवटे यांचे आई वडील आणी त्यांच्या सत्काराच आयोजन् समाजाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भिंगोले सर यांनी केले त्या प्रसंगी ते म्हणाले कि आम्हांला विलास यांचा अभिमान आहे त्याने खडतर परस्थितीतून मिळवलेले यश हे पुढील मुलांसाठी आदर्श आहे.राम नरवटे नरवटवाडीकर हे सत्कार मूर्तीचा परिचय करून देत असताना म्हणाले कि विलास चा प्रवास आम्ही खुप जवळून बघितला आहे त्याची जिद्द आणी संयमी पणा या बळावर त्यांनी मिळवलेलं यश हे गावाला कायम स्फूर्ती देत राहील.सर्व समा जाच्या वतीने स्वीकारल्या नंतर विलास नरवटे समाजाला संबोधित करताना म्हणाले कि माझ्या उपजिल्हाधिकारी होण्यात माझ्या कुटुंबाचा खुप मोठा वाटा आहे.माझा पोलीस दलामध्ये आहे ज्या वेळेस मी अभ्यासासाठी दिल्ली येथे गेलो असता माझा होणारा खर्च दहा हजार महिना होता आणी माझ्या भावाचं वेतन अठरा हजार तो आपल्या कुटुंबासाठी आठ हजार ठेवायचा आणी मला दहा हजार पाठवायचा माझा भाऊ ,वहिनी सपोर्ट सिस्टीम होते तर माझे मोठे भावजी नामदेव हाके हे मार्गदर्शकाच्या रूपात माझ्या मागे उभे होते.माझ्या लहान बहीण आणी देवकत्ते भावजींनी माझ्या गावाकडं माझे आई वडील यांना वेळोवेळी मदत केली म्हणून मी मानसिक दृष्ट्या खंबीर राहिलो.आपण ज्यांच्या सहवासात राहतो त्याच्या कडून खुप काही शिकायला मिळत .मला मिळालेले चांगले मित्र आणी मार्गदर्शक शिक्षक यांच्या मुळे मी हे यश मीळवु शकलो.माझे आई वडील अडाणी होते पण त्यांनी अभ्यास परीक्षा याची कायम विचारपूस केली.त्यांच्या त्या विचारण्यामुळे मला सतत माझ्या कर्तव्याचीकुटुंबासाठी व्हायची त्या मुळे मी भरकटू शकलो नाही.माझ्या सारखी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी कायम आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव ठेवावी.आणी पालकांनी पण आपली मुल बाहेरील शहरात स्पर्धापरीक्षा म्हणजे नेमक काय करतात याची विचारपूस करावी.कुठलीही परस्थिती ही आपण बघितलेल्या स्वप्ना पेक्षा मोठी नसते.आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश हे आपल्याला कायम मिळत.श्रीमती रेखा तरडे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अहमद्पुर तालुक्यातील मुलांना मार्गदर्शनासाठी विनंती केली असता विलास नरवटे म्हणाले कि मी तर तालुक्यातील मुलासाठी कायम मार्गदर्शनासाठी असेल पण माझ्या सारखे अनेक अधिकारी पण उपलब्ध करून देईल असा शब्द दिला. डी वाय एस पी पदी निवड झालेले रायभोले सर आपल्या आणी आपल्या मित्राच्या सत्कार प्रसंगी म्हणाले, तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्हाला अभिमान आहेच पण आमच्या सारख्या मुलांना जेंव्हा आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्या कडून मदतीची अपेक्षा असते तेंव्हा पण तुम्ही दिलेला आधार आमच्या साठी खुप मोठी सकारात्मक ऊर्जा असते.या पुढे जीं खरंच होत करू विध्यार्थी आहेत त्यांना समाजातील लोकांनी मदत करून अनेक अधिकारी घडवण्यासाठी हातभार लावावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश दादा हाके यांनी यांनी सत्कार मूर्तीच कौतुक केल आणी शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर ते म्हणाले विलास न आमच्या समाजाला अभिमान वाटावं अस यश संपादन केल आहे.त्यांच्या आई वडिलांचं कौतुक करताना दादा म्हणाले कि फक्त नोकरवर्ग,किंवा श्रीमंताचिच मुल अधिकारी होऊ शकत नाहीत तर सर्व सामान्यांची मुल पण अधिकारी बनू शकतात हे या आई वडिलांनी आपल्या मुलाला अधिकारी बनवून सिद्ध केल.आणी हा आदर्श समाजांनी घ्यावा.एवढ्या मोठ्या सत्कार समारंभात पण आपल्या आई वडिलांची काळजी घेणारा मुलगा बघून दादांनी त्याच्या संस्कारी पणाच कौतुक केल आणी आपण समाजाचं देण लागतो आपल्या हातून समाजसेवा योग्य रीतीने घडावी असा सल्ला पण दिला आणी येत्या काहिवर्षात आपण जिल्हाधिकारी बनून सामान्य जनतेला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली. अहमद्पुरचे आमदार बाबासाहेब पाटील,अशोक केंद्रे,भारत चामे, दिलीपराव देशमुख,गणेश कदम,डॉ.सिद्धार्थ भाऊ सूर्यवंशी, गोपनर सर,शोभा टोम्पे आदी मान्यवरांनी आपले शुभेच्छा पर मत मांडले कौतुकाची थाप दिली आणी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.अनेक संघटना ,विद्यार्थी,पालक,मान्यवर या कार्यक्रमाला उपस्तिथ होते.या कार्यक्रमाचे आयोजन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले होते.या प्रसंगी बहुसंख्य समाज उपस्तिथ होता कार्यक्रमासाठी बालाजी पारेकर,नामदेव हाकेसर,बळीराम पोले, राजीव पाटील मुकनर,हनुमंत देवकत्ते आणी समाजातील इतर कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली .कार्यक्रमाचे सूत्र परमेश्वर पाटील यांनी केले.