
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
तालुक्यातील मस्सा खं येथील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वर विजय झाला असून मस्सा व सोनारवाडी या दोन गावाचा सहभाग असलेल्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत खंडेश्वरी शेतकरी ग्रामीण विकास पॅनल ने ताबा घेतला आहे.13 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 13 ही जगा या पॅनल ने जिंकल्या आहेत. शंभर पेक्षा जास्त मताधिक्य घेत हा विजय मिळवला आहे.या निवडीचा जल्लोष करत पॅनल प्रमुख सरपंच त्रिंबक कचरे व उपसरपंच संदीप तांदळे यांनी विजयी उमेदवाराचा सत्कार केला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर ही त्यांनी आपले वर्चस्व मिळवले आहे.
मस्सा व सोनारवाडी या दोन गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक मंगळवारी संपन्न झाली. यामध्ये एकूण 1हजार 12 मतदारांपैकी 860 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद शाळेतील एकूण तीन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
यावेळी श्री खंडेश्वरी शेतकरी ग्रामविकास पॅनल व श्री खंडेश्वर ग्राम विकास पॅनल यांच्यात सरळसरळ लढत झाली . यामध्ये १3 जागेसाठी मतदान झाले. मतदान संपल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ झाला.
यात तेरा पैकी 13 ही उमेदवार हे बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवार प्राप्त झालेली मते पुढीलप्रमाणे.
थोरात लक्ष्मण गणपत 444,सतीश हरिदास वर्पे 451 थोरात बाळासाहेब बब्रुवान 430, किरण भगवान तांदळे 429,रामलिंग सुदाम वर्पे 424,थोरात रामराजे निवृत्ती 434,फरताडे हरिदास प्रल्हाद 436, सावंत हरिदास कालिदास 430,महिला प्रतिनिधी सौ थोरात प्रभावती गणपत 413, सौ थोरात दिपाली मनोजकुमार 453,अनु.सु.जाती अरुण श्रीपती ओव्हाळ 472,इतर मागासवर्ग माळी सुधाकर राजेंद्र 462, घोळवे प्रदीप रमेश 470.या प्रमाणे मते मिळाली आहेत.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी ए शिंदे तसेच केंद्र अध्यक्ष राम झाडके,झोंबाडे डि.के,पवार आर.जे यांनी काम पाहिले.यावेळी पोलीस निरीक्षक अतुल पाटील व पोलीस कॉ.मोहिते यावेळी उपस्थित होते.
विजयासाठी सरपंच त्रिंबक कचरे,उपसरपंच संदीप तांदळे,संभाजी वर्पे,अनंत वर्पे,नेमिनाथ इंगोले,बजरंग सावंत,ग्रा प सदस्य गणेश शेळके,चंद्रकांत वरपे,नवनाथ वरपे,तुकाराम थोरात,बिभीषण शिंदे यांनी परिश्रम घेतले.