
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे:महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेतर्फे आज दिनांक ८ मार्च २०२३ वार बुधवार सकाळी ठीक ११:०० वाजता जागतिक महिला दिनानिमित्त महिलांवर होणारे सातत्याने अत्याचार व बळीराजांने कष्टाने व घामाने पिकवलेला कांदा व अन्य शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे दरवाढीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा व केंद्र शासनाने गॅस व पेट्रोल चे वाढणारे दर कमी करून सर्वसामान्य कष्टकरी कामगारांना दिलासा द्यावा तसेच युवा युवती यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे महिला व पुरुष यांनी कोरोना मध्ये गमावलेल्या नोकऱ्या त्यांना पुन्हा मिळाव्या तसेच दोन दिवस अस्मानी संकट काही ठिकाणी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा कात्रज चौक येथे घंटा नाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऋषिकेश गायकवाड, आकाश थोरात,अनमेश सरोदे सचिव – पिंपरी चिंचवड संघ ,प्रदीप गायकवाड उपाध्यक्ष – पिंपरी चिंचवड,
सरीता कांबळे पुणे शहर संघटक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.