
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या भूम येथील संपर्क कार्यालय मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.नभी झेपावणारी तू पक्षीणि ,, सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी,, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी,, शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी, माता सुरक्षित तर घर सुरक्षित “या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला आघाडी जिल्हा संघटक धाराशिव अर्चना दराडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रणरागिनींचा सन्मान करून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. दुर्गा खैरे, डॉ. कुटे ,डॉ मनीषा कराळे, गुरुदेव दत्त मुख्याध्यापिका मुंडे मॅडम, बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता शिल्पा बोराटे, अंबिका देवकर,उषा लवटे, जया उंद्रे, पंचायत समिती कार्यालय ग्रामसेवक वर्ग, पोलीस अधिकारी गदळे मॅडम, पोलीस नायक राजपूत उद्योजक मुक्ता दंडनाईक, वंदना गोरे मॅडम , पंचायत समिती कार्यालय ,तहसील कार्यालय, बांधकाम विभाग ,ग्रामीण रुग्णालय , पोलीस ठाणे, उद्योजक सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय खाजगी कार्यालय सर्व स्तरातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.