
दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
कौठा ता.कंधार येथे दत्त मंदीरात दिनांक ८ मार्च.. जागतीक महिला दिन. साजरा करण्यात आला त्यावेळी प्रमुख वक्त्या प्रा. कुसूम चांडोळकर मॅडम यांनी शक्ती कडून सामर्थ्याकडे या विषयावर आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ. जयश्री बाबूराव देशमुख होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच प्रतिनिधी सौ. शिला गंगाधर हात्ते शिंपाळे मॅडम धुमाळे मॅडम होत्या.प्रमुख वक्त्या प्रा.सौ.कुसूम चांडोळकर आपल्या भाषणात त्यांनी सांगीतले की महिलानी फक्त चूल आणि मूल याकडेच लक्ष दिल पाहिजे असे अनेक जनाना वाटते पण आता महिलानी चूला आणि मूला सोबत देश आणि विदेश यांकडे सुरधा लक्ष देण्याची गरज आहे भारत असा देश आहे तिथे महिलांना देवी मानले जाते नवरात्रीमध्ये मूलीची पूजा केली जाते आपल्या पंरपंरा आणि सहिष्णूतेमुळे या देशाने आपली जगभरात ओळख निर्माण केली आहे परंतू खऱ्या अर्थाने आजही आपण महिलांना आवश्यक तो सन्मान देऊ शकलो नाही न जाणो किती मूली आजूनही शिक्षणाच्या हक्कापासून दूर आहेत मूलीना जन्मापूर्वीच मारले जाते किंवा विकले जाते त्यांना ओझे मानले जाते जे आजही समाजात सुरु आहे सुरक्षेच्या द्रष्टीकोनातून पाहिले तर आता मूली रात्री उशीरा पर्यंत घराबाहेर पडू शकत नाहीत हि सत्य परिस्थीती आहे ती बदलावी लागेल.
खरं तर स्त्रीच कार्य एवढं विपुल आहे की तीच्या सन्माना साठी कुठला दिवस साजरा करायची गरजच नाही. आपल्या हक्कासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत याची जाणीव ठेवली तरी आपोआप महिला दिवस रोजच साजरा होईल अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. स्वप्नजा चांडोळकर ,प्रभाकर पांडे यांनी केले तर सूत्रसंचलन बालाजीराव देशमूख गुरुजी यांनी केले व आभार चेअरमन प्रताप देशमुख यांनी मानले. त्यावेळी गावातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.