
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई — भारज पाटी येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय, ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालय व श्रीराम निवासी कर्णबधिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संकुलात गुरुवारी (ता.९) जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या म्हणजे कला, साहित्य, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्र, सैनिकी माता, गृहणी अशा सर्व पंचक्रोशीतील नारी शक्तींचा व त्यांच्या कार्याचा गुणगौरव करून महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल त्या महिलांचा सत्कार ठेवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिता शिंदे होत्या. अंबाजोगाईच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे मँडम,वेणूताई महिला विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका प्रतिभा देशमुख, प्रज्ञा मुळे, भारजच्या सरपंच वनमाला शिंदे , श्रीराम माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलप्रभा ढाणे, ज्ञानसागर निवासी कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी देशमुख, उपमुख्याध्यापक पाराजी हारे, श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक कर्णबधिर विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश बागुल उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील बालिकाबाई शिंदे, साधना इरलापल्ले, प्रतिभा देशमुख, रोहिणी काळे, ज्योती जोगदंड, कुसुम शिंदे, मिराबाई शिंदे, जयश्री इंगळे, शामल शिंदे, रेखा शिंदे, रोहिणी शिंदे या महिलांचा सन्मानचिन्ह, शाल, फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तानाजी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. आभार मनीषा राजमाने यांनी मानले. लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दशरथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला.