दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा तालुक्यातील खोराड सावंगी येथील युवक संदीप प्रल्हादराव ठाकरे यांच्या विरुध्द मागील एक महिन्यापूर्वी मंठा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो गुन्हा हा खोटा असून सदरील गुन्हा मागे घेण्यात यावा, नसता इच्छा मरणास परवानगी देण्याची मागणी मागणारे पत्र दि.6रोजी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीण्यात आले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, तक्रारदार संदीप ठोकरे हा दि. १४ जानेवारी २०२३ रोजी नंदिग्राम एक्सप्रेस मुंबई येथे गेला होता.तसेच त्याने दि. १५ जानेवारी रोजी साधारण ३:३० वा. विवेना मॉल ऑनलाईन पेमेंट करुन वेड हा मराठी सिनेमा पाहिला होता. तसेच दि. १५ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत मुबई येथे होता. या कालावधीचे मोबाईल नेटवर्क तपासण्यात यावे असे पत्रात म्हंटले आहे. दि. २४ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कोणतीही शहानिशा न करता खोराडसावंगी येथील सरपंच फिर्यादी प्रयागबाई सिताराम राठोड यांच्या म्हणण्यानुसार संदीप ठोकरे यांने दि. १५ जानेवारी रोजी.सकाळी ८ वाजता फिर्यादी यांच्या घरी जाऊन धमकावून शिवीगाळ केली व २५ हजार रुपये खंडणीची मागणी केली म्हणून भादंवि कलम ३८५, ५०४, ५०६ अन्ये खोटा गुन्हा दाखल केला. सदरील प्रकरणी पुरावे दाखल केल्यानंतरही गुन्हे मागे घेण्यात आलेले नसून मी शिक्षण घेत आहे. या खोट्या
गुन्हामुळे मी सरकारी नोकरीपासून वंचित राहू शकतो. त्यामुळे माझे भविष्य अंधारमय झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या तक्रारीची दखल घ्यावी. माझे म्हणणे खोटे असेल तर माझ्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. पण माझे पुरावे तपासणीत खरे आढळल्यास फिर्यादी व पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासाठी सोमवार रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय जालना या ठिकाणी निवेदन देण्यात आले असून कारवाई करावी न झाल्यास मी मुंबई मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या दालनासमोर विष प्राशन करून माझी जीवन यात्रा संपवणार असे पत्रात म्हटले आहे
